माधुरी त्या काळातील एकमेव अशी अभिनेत्री होती जीचे शुल्क हे त्याकाळातील नायकांएवढेच होतेबॉलिवूड मधील अभिनेते हे इतकी दमदार जीवनशैली जगतात की दुरून बघणाऱ्या चाहत्यांना सुद्धा तसेच आयुष्य जगावे वाटते. हे कलाकार नेहमीच त्यांचे लूक, जीवनशैली आणि गुंतवणुकीबद्दल चर्चेत असतात.
कधी या कलाकारांच्या बुटांच्या किमती चर्चेत येतात तर कधी अभिनेत्रींच्या बटव्याचा खर्च चाहत्यांना आश्चर्यचकित करतो. अशा परिस्थितीत चाहत्यांच्या मनात नेहमी हा प्रश्न येतो की या कलाकारांची किती कमाई असेल ?
आज हे कलाकार करोडो रुपये शुल्क घेतात, पण खरच हे कलाकार पहिल्यापासूनच एवढे मोठे शुल्क आकारत होते का ? 90 च्या दशकात असे अनेक कलाकार होते जे त्या दिवसांनुसार मोठे शुल्क आकारत होते. तुम्हाला आम्ही सांगतो की कोण होते ते कलाकार जे 90 च्या दशकापासून आतापर्यंत चित्रपटसृष्टीमधून करतात मोठी कमाई
अमिताभ बच्चन- अमिताभ बच्चन यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ही 70 च्या दशकापासून सुरू केली होती. 90 चे दशक येता येता ते शहंशाह झाले होते. 90 च्या दशकात ते एवढे मोठे कलाकार बनले होते की ते आपल्या चित्रपटांसाठी मोठे शुल्क आकारत होते. ‘
खुदा गवाह ‘ या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांना त्या काळात 3 कोटी रुपये शुल्क दिले गेले होते. याशिवाय अमिताभ हे आपल्या दूरदर्शन वरील मालिका कौन बनेगा करोडपती साठी करोडो ने शुल्क घेत होते.
माधुरी दीक्षित- 90 च्या दशकातील अत्यंत सुंदर आणि प्रतिभावान नायिकांमध्ये गणना केली जाणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित चे आज पण खूप प्रसिद्ध आहे. त्या दिवसात नायिका प्रसिद्ध तर होत होत्या, परंतु त्यांचे शुल्क हे नायकांसारखे नव्हते. त्यावेळी माधुरी ही अशी प्रसिद्ध नायिका होती ज्यांना पडद्यावर बघण्यासाठी चाहते येडे व्हायचे.
अशा परिस्थितीत माधुरी 90 च्या दशकातील सर्वात महागडे शुल्क घेणाऱ्या नायिकांमधून एक होती. सलमान सोबत आलेला चित्रपट ‘ हम आपके है कोन ‘ च्या यशानंतर ‘ कोयला ‘ चित्रपटासाठी माधुरी यांनी 50 लाख रुपये घेतले होते.
अक्षय कुमार- अक्षय हे बॉलिवूड मधील अशा नायकांमधून एक आहेत की त्यांची जादू ही 90 च्या दशकापासून अखंडपणे चालू आहे तसेच वाढत आहे. 1994 मध्ये आलेला चित्रपट ‘ मोहरा ‘ साठी अक्षयने 55 लाख रुपये घेतले होते. हा चित्रपट पडद्यावर जबरदस्त हिट झालं होता.
यानंतर अक्षयने प्रत्येक चित्रपटासाठी भारी शुल्क आकारण्यास सुरुवात केली. अक्षय आज सर्वात महागड्या नायकांमध्ये एक मानले जातात. अशी बातमी आहे की अक्षयने आपल्या येणाऱ्या चित्रपटासाठी सुमारे 120 कोटी रुपये घेतले आहेत.
अजय देवगण- 90 च्या दशकात अजय देवगण हे खूप मोठे कलाकार बनून गेले होते आणि आज सुद्धा ते प्रसिद्ध अभिनेते मानले जातात. स्टंट्स आणि अँक्शन्स ने चाहत्यांचे मन जिंकणारे अजय देवगण सुद्धा 90 च्या दशकात चांगले मोठे शुल्क आकारत होते. त्याकाळात त्यांनी एका चित्रपटासाठी तब्बल 70 लाख रुपये घेतले होते. आज अजय आपला प्रत्येक चित्रपट हा कोटींमध्ये करतात.
सनी देओल- अँक्शन चित्रपट आणि आपल्या दमदार संवादाने लोकांना आपला चाहता बनवणारे सनी देओल हे आजच्या काळात दिग्दर्शनात उतरले आहेत. तथापि, 90 च्या दशकात सनी देओल यांनी एकापेक्षा एक चित्रपट केले आहेत. यामध्ये दामिनी, गदर, घायल यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
चित्रपट ‘ जानी दुश्मन ‘ साठी सनी यांनी त्या काळात जवळपास 50 लाख रुपयांपर्यंत शुल्क आकारले होते. याशिवाय ते आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी 60 ते 70 लाख रुपये घेतात.
सुनील शेट्टी- ‘ बलवान ‘ चित्रपटाद्वारे चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवणारे सुनील शेट्टी हे 90 च्या दशकातील एक मोठे कलाकार होते. अक्षय सोबतची त्यांची जुगलबंदी चाहत्यांना खूप आवडत होती. आज जरीही सुनील चित्रपटापासून दूर असेल पण, एक काळ असा होता जेव्हा ते चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजत होते. त्या काळात सुनील शेट्टी आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी 30 ते 40 लाख रुपये घेत असत.
शाहरुख खान- बॉलिवूड च्या किंग खान ने 90 च्या दशकात चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवले होते, परंतु त्यांचे चाहते आजही खूप आहेत. त्याकाळात शाहरुख ने एकापेक्षा एक चित्रपटात काम केले होते.
त्यांचे यश बघून त्यांचे शुल्क सुद्धा वाढत होते. 90 च्या दशकात शाहरुख खान हे एका चित्रपटासाठी 30 ते 40 लाख रुपये घ्यायचे. आज तर शाहरुख त्यांच्या प्रत्येक चित्रपटाचा करार हा कोटींमध्ये करतात.